Skip to Content

स्वप्नातील घर बांधन्याच्या तुमच्या

जिद्द , कष्ट व चिकाटीला सलाम

 इंजि. निखिल नागपुरे

लहान कुटुंब, टुमदार घर...

मस्तपैकी एक छोटासा प्लॉट, त्यात एक छोटा पण टुमदार 2 BHK घर. दिसायला सुंदर व आधुनिक सुविधा युक्त. झाडे लावायला कॅरी आणी एक गार्डन. 

आणी हो, आमची कार म्हणजे आमची फॅमिली मेंबरच बरं का.. तर तिच्याकरीता पार्किंग हवीच.

अहो हेच तर आहे तुमच्या, आमच्या आणी आपल्या सारख्या कित्येक लोकांच्या स्वप्नातील घर.

चला तर मग , तुमच्या बजेट मध्ये बसणारं DREAM HOME बनवूया...

सरांचा "डुप्लेक्स बंगला" म्हणजे विषयच भारी... 

मोठ्या खिडक्या, भव्य-दिव्य दरवाजा. एका नजरेत येणार नाही अशी उंच बिल्डिंग. टेरेस वरुण दिवसा पूर्ण गाव दिसतो आणि रात्री हात वर केला तर जणू तारे हातात येणार असं वाटते.

आतमधून बंगला सिनेमात दाखवतात तसाच. उंच हॉल व त्यात मोठा सोफा, आतमधून पायर्‍या. बेडरूम म्हणजे तर 5 स्टार हॉटेलच. सगळं काही अटॅच. 

आणि किचन?? एकदा गृहिणी आतमध्ये गेल्या की बाहेर यायची इच्छाच होत नाही म्हणे त्यांची...

कुणी म्हणजे... आम्हीच डिजाइन करुन दिलाय तो डुप्लेक्स. तुम्हाला पण हवा असेल तर आम्हाला संपर्क नक्की कराच.

घर बांधकाम करण्याआधी हे नक्की वाचा ! 

Construction trends you need to know !

Your Dynamic Snippet will be displayed here... This message is displayed because you did not provide both a filter and a template to use.

 Experience
12 years

Projects deployed
+225

 Project Cost
+Rs.65 Cr

Customer Satisfaction
+95% 

3D Planning & Elevation

Structural & Working Drawings

Interior, Walkthrough

Landscaping, Rooftop Garden

मग कधी करायची सुरुवात तुमच्या घर बांधकामाची ?


बांधकाम सुरु करण्या अगोदर महत्वाचं आहे त्याची संपूर्ण प्लानिंग.

त्यामध्ये कितीतरी गोष्टी येतात, जसे..

बांधकाम परवानगी, लोन केस, ठेकेदारासोबत करार, वास्तुशास्त्र, Floor Planning, Elevation, Interior. etc...

ह्या सर्व Documents ला आपण तीन भागामध्ये मोडू शकतो. 

Legal

बांधकाम परवानगी

हे  Documents आपल्याला ग्रामपंचायत / नगर पंचायत / नगर परिषद मधून  Legally बांधकाम करण्याची परवानगी देतात. म्हणून समोर जाऊन काही Legal अडचणी येत नाही.

Financial

बँक लोन

हे  Documents आपल्याला बँकेतून आर्थिक मदत मिळवून देण्यास मदत करतात. ज्यामुळे बांधकाम पैश्या अभावी थांबत नाही.

Actual

प्रत्यक्षात घर बनणार कसं?

हे सर्वात महत्वाचे. कारण या Documents वरूनच ठरतं कि आपला घर नेमकं कसं बनणार. आतून, बाहेरून कसं दिसणार? सोय/गैरसोय कशी आहे? घरात हवा व प्रकाश किती? Privacy व Accessibility कशी आहे?  एकंदरीत तुमच्या आयुष्याची कमाई सफल होणार कि नाही हे यावरून ठरते. म्हणून हे documents सर्वात महत्वाचे ठरतात. आणि जास्तीत जास्त घरमालक नेमके हेच documents बनवत नाही. आणि म्हणून सारखेच पैसे खर्च करून सुद्धा खूप लोकांचे घरं साधी दिसतात.

लक्षात घ्या, पैसे असणे वेगळे , ते वापरता येणे वेगळे...

चला तर मग , इथपर्यंत तुम्ही सर्वकाही वाचत आलाय म्हणजे तुम्हाला आमचं लिहिलेलं पटत आहे असं मी गृहीत धरतोय.

आम्हाला संपर्क करणे व आमच्या सोबत जुडून तुमच्या घराला अजून सुंदर, मजबूत, टिकाऊ व Budget Friendly बनवणे अगदी सोप्पं आहे. खाली दिलेल्या नंबर वर आम्हाला संपर्क करा व तुमच्या सर्व प्रश्नांची आधी समाधान करून घ्या. आणि मगच बांधकामाला सुरुवात करा.

Contact : 9168949392

नोकरी शोधताय ?

तर लगेच ह्या बटन वर क्लिक करुन फॉर्म भरा. आमची टीम लवकरच तुमच्या पर्यंत पोहोचेल.