Skip to Content

अनुभवी इंजिनीअर ची खरच गरज आहे काय ?

Investment or unnecessary expenses

घर बांधकाम करतांना खूप लोकांना प्रश्न पडतो,

इंजिनिअर ची खरच गरज आहे काय?

बांधकाम परवानगी व बँकेची लोन केस पुरता इंजिनिअर लागतो मग त्याच काय काम? आता खूप लोकांनी स्वतःच्या व ठेकेदाराच्या मौलिक सल्ल्याने व दांडग्या अनुभवाने घर बांधलेच आहेत. त्यांचे तर घर अजूनही पडले  नाहीत व दिसायला सुद्धा चांगलेच आहेत. कशाला उगाच इंजिनिअर चा खर्च करायचा? तेवढ्या इंजिनिअर च्या फीस मध्ये माझी Modular Kitchen किंवा POP होते. हे खूप घरमालकांचे गणित (Expert Financial Calculations) असते.

मग स्वतःचे मत अगदी बरोबर आहे हे स्वतःलाच पटवून देण्याकरीता हे आजूबाजूच्या अश्या घरमालकांची भेट घेतात ज्यांनी कुठलेही मार्गदर्शन न घेता स्वतःच घर बांधलं. मग दोन्ही घरमालकांच्या (नवीन व जुना) 'बांधकाम कसं करायचं' या विषयावर अफाट चर्चा होतात. "आम्ही कसं आमचं घर बांधलं, कसं स्वतःच नकाशा काढला, ठेकेदार निवडला, इकडची रूम तिकडे केली, कसा kitchen ओटा बनवला, सामान कसा घेतला, वगैरे वगैरे...

अगदी बांधकामाची सुरुवात कशी केली इथपासून गृहप्रवेशाच्या जेवणात कोणता मेनू ठेवायचा (आणि का?) इथपर्यंत सर्व मुद्द्यांवर जुना घरमालक वेळात वेळ काढून मार्गदर्शन करतो. या चर्चे दरम्यान घर-लक्ष्मी सुद्धा अगदी माहेरचे पाहुणे आल्यासारखं हौशीने २-३ वेळा चहा करते.

आता हे जरी मी गम्मत म्हणून सांगत असलो तरी एकीकडे मजेदार सत्य सुद्धा आहे. त्याची एक वेगळी मजा आहे.

पण घर म्हणजे सर्वकाही. आयुष्याची कमाई  लावून आपण घर बांधतो. म्हणून तुमचं कर्तव्य आहे कि सर्व गोष्टींची शहनिशा करून मगच बांधकामाला सुरुवात करणे.

त्यासाठी गरजेची आहे इंजिनिअर सोबत तुमची सल्ला मसलत.

आता इंजिनिअर नेमकं काय वेगळ करणार जेणेकरून तुमचा घर जास्त चांगला बनतो ? तर, इंजिनिअर (म्हणजे आम्ही) घराबद्दल कधीहि फक्त भावनात्मक निर्णय घेत नाही. संपूर्ण घर बांधकाम करतांना आम्ही वेगवेगळ्या गोष्टींचा समतोल साधतो.

सर्वात आधी आम्ही संपूर्ण माहिती गोळा करतो. अगदी वैयक्तिक व बांधकामाशी निगडीत दोन्ही. उदा:

परिवारात किती लोक आहेत.

मुला मुलींचे शिक्षण / लग्न

काय बांधकाम करणे आहे व का?

कार / बाईक किती

प्लॉट साईझ व शेप

दिशा

वास्तुशास्त्र

रस्ते व नाल्यांची सोय

रस्त्यांची उंची

आजुबाजुला बनलेले घरं

भविष्याची तरतूद

किरायदारांची सोय

बांधकाम मजबुती

ठेकेदार (यावर आम्ही एक संपूर्ण लेख लिहिलेला आहे. लिंक https://www.nikhilnagpure.com/blog/our-blog-1/tthekedaar-ksaa-nivddaavaa-3?anim )

कायदेशीर करार

Interior Budget

आणि अश्या भरपूर गोष्टी असतात ज्यावर चर्चा होते. मग त्यानुसार तुमच्या घराच्या कागदी आखणीस सुरुवात होते. त्याचा क्रम याप्रकारे :

Planning - या मध्ये आम्ही ५ तत्वांचा प्रामुख्याने विचार करून त्या नुसार घराची मांडणी करतो. ते तत्व म्हणजे  " " नियम, गरज, निसर्ग (वास्तुशास्त्र), सुविधा, बजेट ". यामुळे तुमच्या घर बांधकामात चुका होण्याचे व तोडफोड होण्याची शक्यता उरत नाही. म्हणजेच सुंदर घर व पैश्यांची बचत.

Elevation / Exterior - घराचा एकदा नाकाशा बनला कि मग बनतो Elevation. म्हणजेच तुमचा घर बाहेरून कसा दिसेल. घराच्या foundation चे खड्डे खोदायच्या आधी आम्ही ठरवतो कि घर बाहेरून कसं दिसणार आहे, जेणेकरून त्या Elevation नुसार तुमच्या घराचं बांधकाम वर जावं. यामुळे अगदी फोटो मध्ये जसा घर दिसतो तसाच प्रत्यक्षात बनण्यास मदत होते व त्याच बजेट मध्ये जास्त सुंदर घर बनतो. (असं समजा कि २५ लाखात बनलेला घर बाहेरून बघताना ३० लाखांचा वाटतो). म्हणजे परत पैश्यांची बचत व फायदाच.

Structural & Working Drawings - यामध्ये तुमच्या घराला काय साईझ चे Foundation, Column, Beam,etc असणार व त्यात कोणता व किती लोहा लागणार हे आम्ही ठरवतो. हे सर्व गोष्टी technically calculated असल्यामुळे लोहा wastage होत नाही आणि कमी सुद्धा पडत नाही. याचा फायदा आपल्या घराच्या मजबुतीसाठी होतो. More Life, More Value. म्हणजे परत बचत. अश्याच आणि बऱ्याच technical drawings आम्ही वापरतो ज्यांचा फायदा घर बांधकामात होतो. (सर्व इथे लिहिणे जमणार नाही).

Inspection - Drawings तर सर्व बनवल्या पण प्रत्यक्षात होणार्या चुकांचं काय? ठेकेदार व त्याची team नेमकं ठरल्यानुसार काम करते काय हे सुद्धा चेक करणे तेवढेच गरजेचे. साईट वर चुका होत असतात पण त्या व्हायच्या आधीच जर टाळल्या तर जास्त चांगलं काम होऊ शकते व तोडफोड सुद्धा कमी होते. घर चुकत नाही व पैश्यांची बचत सुद्धा होते.

अश्या आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्यावर चर्चा होऊ शकते, पण ते सर्व इथे लिहिणे शक्य नाही.

सरतेशेवटी एवढच सांगेन कि, योग्य बजेट मध्ये उत्तम घर बांधकाम होत असेल व इंजिनिअर च्या फीस पेक्षा जास्त बचत होत असेल तर...

इंजिनिअर चा सल्ला घेऊ नका... अनुभवी इंजिनिअर चा सल्ला घ्या...  नुकसान काहीच नाही.

घर बांधकाम करतांना १ - २ लाख आपण कशे वाचवू शकतो हे जाणून घ्यायचं असेल तर सविस्तर चर्चे करिता तुम्ही आम्हाला वर दिलेल्या नंबर वर फोन करू शकता. धन्यवाद.

*Written by,*

Er Nikhil Nagpure

ठेकेदार कसा निवडावा ?
अनुभव व रेट