बिल्डिंग मटेरियल – स्टील / लोहा
कुठल्याही प्रकारचे बांधकाम असो, त्यात कित्येक प्रकारचे मटेरियल आपण वापरतो. त्याबद्दल तुम्हा सर्वांना बर्यापैकी माहिती आहे असे मी गृहीत धरतो. ‘बिल्डिंग मटेरियल’ च्या या नवीन सिरिज मधे आपण प्रत्येक वेळी वेगवेगळ्या मटेरियल बद्दल चर्चा करणार आहोत.
आजचा आपला टॉपिक आहे स्टील / लोहा
कुठल्याही प्रकारचा Structural Work असो उदा: फाऊंडेशन, कॉलम, बिम, स्लॅब, त्यामध्ये स्टील / लोहा हा प्रामुख्याने आलाच. पण खूप लोकांना याचे महत्व माहीत नाही. त्याचे महत्व एका उदा: मधून समजून घेऊया.
जसे हाडे आपल्या शरीराला मजबूती व लवचिकता देतात तसेच स्टील / लोहा हा बिल्डिंग ला मजबूती व लवचिकता देतो. म्हणून आपली हाडं व बिल्डिंग चा स्टील / लोहा मजबूत असणे खूप गरजेचं आहे.
आता माझ्या अनुभवातून मी बघितलं आहे की जास्तीत जास्त घरमालक बांधकामात लोकल / स्वस्त लोहा वापरतात. त्यांच्या बाकी पूर्ण घराला ब्रांडेड मटेरियल असतो, खास करून इंटिरियर मधे. मॉडुलर किचन, पेंट, फर्निचर, टाइल्स, अशे कित्येक सामान अगदी ब्रांडेड. पूर्ण मार्केट रिसर्च करून, १०-१२ बनलेल्या घरांना भेट देऊन, दुकानांना भेट देऊन मटेरियल निवडतात. ‘घर एक वेळा बनते’ म्हणत, स्वतःचा बजेट ओढत-तानत, सामान निवडतात. आता हा रिसर्च करणे हे वाईट किंवा चुकीचं आहे असं मी म्हणत नाहीये. उलट हे अगदी गरजेचं आहे आणि प्रत्येकाणी करायलाच पाहिजे.
पण मग एकच प्रश्न पडतो की, सगळं काही ब्रांडेड, तर मग स्टील / लोहा हा लोकल का?
ज्या मटेरियल वर संपूर्ण बांधकामाच्या मजबुतीची जिम्मेदारी आहे नेमका तोच मटेरियल लोकल का?
पैसे उरतात म्हणून? – किती? खरचं उरतात की फक्तचं बाहेरून ऐकलं आहे? एकदा संपूर्ण रिसर्च करायला नको?
चला तर मग आज आपण लोकल आणि ब्रांडेड स्टील मधे काय फरक आहे व पैश्यांची खरच बचत होते काय ते बघूया.
लोकल स्टील हा स्क्रॅप च्या मटेरियल ला गलवून बनवल्या जातो. म्हणजे भंगार मधून गोळा केलेला सगळ्या प्रकारचा लोहा पिघलवून त्याला रीसायकल करायच व त्यापासून स्टील बार बनवायचे. लो क्वालिटी आणि चुकीच्या प्रोसेसने बनवलेल्या या बार ची गुणवत्ता, मजबुती व लवचिकता सुद्धा खालच्या दर्जाची असते. त्यामुळे वजन सहन करण्याची क्षमता सुद्धा कमकुवत होते, परिणामी बांधकामाची मजबुती कमी होऊन लाइफ कमी होते.
याउलट जे ब्रांडेड स्टील असते त्याला बनवण्याची प्रोसेस ही अचूक व नियमानुसार असते. खानीमधून जे खनिज मिळतात त्यांच्यावर योग्य प्रक्रिया करुन हे स्टील बार बनतात. म्हणून यांची गुणवत्ता, मजबुती व लवचिकता ही IS Code नुसार असते, परिणामी बार ची लाइफ सुद्धा जास्त असते.
मग आता लोकल आणि ब्रांडेड स्टील कोणते आहेत व ते ओळखायचे कसे?
तर लोकल स्टील च्या कंपन्या ह्या बदलत असतात. त्यामुळे २ वर्षा आधी जो ब्रांड मार्केट मधे चालत होता तो आता मिळेलच याची शाश्वती नाही. पण ब्रांडेड स्टील ह्या कित्येक वर्षांपासून मार्केट मध्ये आहेत व आपल्या कस्टमर ला सेवा देत आहेत.
उदाहरण द्यायचं झाल तर TATA STEEL हि नावाजलेली कंपनी आहे व सर्वात बेस्ट क्वालिटी चं स्टील आजही देत आहे. आमच्या कित्येक प्रोजेक्ट्स मध्ये आम्ही TATA STEEL वापरलं आहे व नेहमीच आम्हाला Best Result मिळाले आहेत.
खूप customer ला असं वाटते कि लोकल स्टील त्यांना TATA STEEL पेक्षा स्वस्त पडतो. पण वास्तविकतेनुसार गणित उलट आहे, कशे ते बघा...
१) लोकल स्टील - वजनानुसार मिळतो, म्हणजे काट्यामधे वजनाच्या चोरीची शक्यता दाट असते (१ क्विंटल मागे सरासरी ५-७ kg)
TATA STEEL – नगानुसार मिळतो. जेवढे नग, तेवढेच पैसे. आणि नग कुणीही मोजू शकतो.
२) लोकल स्टील – कमी ग्रेड (Fe 415) चा स्टील असल्यामुळे कमी मजबुती
TATA STEEL – जास्त ग्रेड (Fe 550) चा स्टील असल्यामुळे जास्त मजबुती
३) लोकल स्टील – कमी लवचिकता (Ductility) असल्यामुळे बेंड केला कि लगेच तुटतो किंवा वापस आपल्या शेप मध्ये येत नाही. (उदा: सुकलेली काडी)
TATA STEEL - जास्त लवचिकता (Ductility), लवकर मोडत नाही व शेप सहजासहजी सोडत नाही.
४) लोकल स्टील – कमी भूकंप रोधक व जंग रोधक
TATA STEEL - भूकंप व जंग सोबत लढण्याची क्षमता जास्त.
५) लोकल स्टील – Bar Diameter (१०mm / १२ mm, etc) हे अचूक नसतात. बहुधा ते under guage असतात. प्रत्येक बार ची लांबी सुद्धा सारखी नसते. ज्यामुळे वजनात व क्वालिटी मधे फरक पडतो.
TATA STEEL - Bar Diameter (१०mm / १२ mm, etc) हे अचूक व IS code नुसार असतात. प्रत्येक बार ची लांबी सुद्धा सारखी असते. ज्यामुळे योग्य किमतीत योग्य सामान मिळतो.
6) लोकल स्टील – कमी गुणवत्तेमुळे जास्त स्टील वापरावा लागतो.
TATA STEEL - जास्त गुणवत्तेमुळे कमी स्टील वापरावा लागतो.
म्हणजे एकंदरीत जर आपण बघितलं तर TATA STEEL ची दिखाऊ किंमत आपल्याला जास्त वाटत असली तरी संपूर्ण बांधकामाला लागणारी स्टील ची किंमत हि लोकल स्टील पेक्षा कमी / सारखी पडते.
फक्त त्याकरिता तुम्हाला TATA STEEL च्या मजबुतीनुसार फाऊंडेशन, कॉलम, बिम, स्लॅब यांना लागणारा स्टील calculate करणे गरजेचं आहे ज्याला आम्ही Structural Design म्हणतो.
जर तुम्हाला तुमच्या बांधकामाकरिता TATA STEEL वापरायचं असेल व त्याकरिता Structural Design ची गरज असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता.
आम्ही तुम्हाला मोफत Structural Design बनवून देऊ. तसेच इंजिनिअर कोट्यातून Discount सुद्धा मिळवून देण्याचा प्रयत्न करू.
तर हि आहे थोडक्यात माहिती स्टील / लोहा या बिल्डिंग मटेरीअल बद्दल. समोरच्या ब्लॉग मधे आपण नवीन मटेरीअल वर चर्चा करूया.
जर तुम्ही नवीन घर / हॉस्पिटल / Marriage Hall / School / कॉम्प्लेक्स etc बांधायचं असेल तर तुम्ही आमच्या www.nikhilnagpure.com या website वर जाऊन आमच्याशी संपर्क करू शकता.
*Written by,*
Er Nikhil Nagpure
BE Civil
MBA (Advanced Construction Management)