Episode - 2
घर बांधकामासाठी प्लॉट खरेदी करतांना...
*"2 लाखापर्यंत कशे वाचवणार?"*
प्लॉट खरेदी करतांना जर आपण खालील मुद्द्यांचा विचार केला तर घर बांधकाम करताना तुमची *2 लाखापर्यंत* नक्कीच बचत होईल.
*1) भरण भरणे / Backfilling / Plinth Filling*
- रोड लेव्हल व ग्राउंड लेव्हल मधील फरक हा कमीत कमी असेल आणि,
- रोड हा आधीच बनलेला असेल तर...
तुमच्या घराच्या फाऊंडेशन ची उंची अंदाजे 3 ते 6 फुटांनी कमी होते.
Average Total Saving - Rs 25,000 - Rs 40,000
*2) बोअरवेल / Borewell*
- पाण्याची पातळी चांगली असेल तर अंदाजे ४० फूट पर्यंत कमी खोदावी लागु शकते (सर्व्हे - भंडारा / गोंदिया जिल्हा)
Saving - 40 X 300 / ft. = Rs 12,000/-
*3) जमिनीचा प्रकार / Soil Types*
- Hard Soil - Less Foundation Depth (Say 4 ft)
- Medium Soil - Say 5-6 ft
- Soft Soil - 6-9 ft (may be required to design specially which may cost around 40,000/-)
Saving - Rs 12,000 to Rs 40,000 according to soil type.
*4) पावसाळ्यात साचणाऱ्या पाण्याची पातळी*
- जर प्लॉट च्या आजूबाजूला पावसाळ्यात पाणी जमा होत असेल व वाहत्या पाण्याचे नियोजन नसेल तर Foundation च्या भरणाची उंची आणखी 2-4 फूट वाढु शकते.
- म्हणूनच पावसाच्या पाण्याचे नैसर्गिक नियोजन असलेल्या ठिकाणी प्लॉट घ्यावा.
Saving - Around 15,000 - 30,000 /-
*5) नाल्यांची सोय / Drainage System*
- जर प्लॉट च्या आजूबाजूला नाल्यांची सोय केलेली असेल तर तुम्हाला नाली बांधायची गरज नाही.
Saving - Rs 4,000 - Rs 15,000
*6) विद्युत वितरण / Electricity Distribution*
- जर प्लॉट पर्यंत Electricity आली नसेल तर टेबलावरची आणि टेबलाखालची फीस महागात पडू शकते. म्हणूनच याची सोय अती आवश्यक आहे.
Saving - Rs 5,000 - Rs 60,000/- (साहेबानुसार)
*7) NATP Registration*
- फक्त NA असलेला प्लॉट आता शक्यतो घेऊ नका. सध्या Govt च्या नवीन GR नुसार NA + TP असलेल्या प्लॉट लाच घर बांधकामास मंजुरी मिळत आहेत.
- तसेच NATP असलेल्या प्लॉट / लेआऊट मध्ये सोयी जास्तीत जास्त मिळतात.
Saving - घर बांधायला लवकर परवानगी मिळणे.
- लोन केस ला मंजुरी मिळणे.
*8) वास्तुशास्त्र / Vastu Shastra*
- खूप लोकांना हे देवा-धर्माचे थोतांड वाटते. काही हरकत नाही.
- परंतु वैज्ञानिकदृष्ट्या / Scientifically मात्र वास्तू खुप गरजेचं आहे. आणि तुमच्या आरोग्यावर याचा नक्कीच परिणाम होतो.
Saving - आरोग्य / Health (अमूल्य)
तर याप्रकारे अश्या अनेक गोष्टींचा विचार करून तुम्ही Savings करू शकता.
आशा आहे की तुम्हाला ही माहिती आवडली असेल.
या माहितीला जास्तीत जास्त लोकांपर्यंत Share करा, आणि त्यांची सुध्दा माहिती वाढवा.
*Written by,*
Er Nikhil Nagpure